Korean Female YouTuber | (PC- Twitter)

मुंबई पश्चिम उपनगर खार (Khar) येथे झालेल्या कोरियन महिला (Foreign Women) यूट्यूबर (YouTuber) कथीत विनयभंग प्रकणात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. मोबीन चंद मोहम्मद शेख (Mobeen Chand Mohammad Shaikh) आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी (Mohammad Naqeeb Sadrealam Ansari) या दोन तरुणांची नावे आहेत. लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान एका कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याचा दोघांवरही आरोप आहे. या दोन्ही तरुणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. या गुन्हाप्रकरणी खार पोलिसांनी दोघांना अटक केली.

मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी हे दोन्ही आरोपींचे वय अनुक्रमे 19 वर्षे आणि 20 वर्षे आहे. कोरियन महिला खार रेल्वे स्थानकाजवळील रोड नंबर पाचवर लाईव्हस्ट्रीमिंग करत होती. या वेळी या दोघांनी जबरस्तीने तिचा हात पकडला. तिला आपल्या दुचाकीवर बसण्यासाठी आग्रह केला. तसेच, तिचे चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रकारास पीडित महिलेने विरोध दर्शवला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यासमोरच घडत होता. या तरुणीने या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. तिने ही पोस्ट मुंबई पोलिसांनाही टॅग केली आहे. त्यानंतर सुमोटे दाखल करत पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढच्या काही तासांतच आरोपींना अटक केली. (हेही वाचा, Mumbai Shocker: चेंबूर मध्ये बापावर त्यांच्याच घरात अल्पवयीन लेकीवर विनयभंगाच्या आरोपाखाली FIR दाखल)

ट्विट

दक्षिण कोरियाची नागरिक असलेल्या या पीडित महिलेने मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, खार रोड परिसरात मी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना काही तरुणांनी मला त्रास दिला. माझ्याशी गैरवर्तन केले. मी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना जवळपास 1000 लोक ते पाहात होते. त्या सर्वांसमोर तरुणांनी हा प्रकार केला. पोलिसांनी घडल्या प्रकाराची तातडीन दखल घेत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.