
Sonali Sood Health Update: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याची पत्नी सोनाली सूद (Sonali Sood Accident) कार अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मुंबई-नागपूर महामार्गावर (Mumbai-Nagpur Highway) आज (मंगळवार, 25 मार्च 2025) पहाटे घडली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे आणि सध्या त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पत्नीच्या अपघातानंतर अभिनेता नागपूरला पोहोचला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता आणि त्याची पत्नी शिर्डी साईबाबाचे भक्त आहेत. साईबाबांच्या कृपेमुळे आपली पत्नी गंभीर अपघातातून वाचू शकली, अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिल्याचे समजते.
अपघाताचे कारण आणि जखमींच्या प्रकृतीच्या माहीची प्रतिक्षा
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताच्या वेळी सोनाली सूद हिचा पुतण्याही कारमध्ये उपस्थित होता. दोघांनाही आवश्यक वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची बातमी मिळताच, सोनू सूद तातडीने नागपूरला पोहोचल्याचे वृत्त आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते अपघाताची चौकशी करत आहेत. प्रतामिक माहितीनुसार ट्रक आणि कारमध्ये झालेल्या धडकेमुळे हा अपघात घडला आहे. दरम्यान, अपघाताचे कारण आणि जखमींच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतिक्षा आहे. (हेही वाचा, Arrest Warrant Issued for Sonu Sood: पंजाब कोर्टाने 10 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सोनू सूदविरुद्ध जारी केले अटक वॉरंट, अभिनेत्याच्या अडचणीत वाढ)
कोण आहे सोनाली सूद?
सोनाली सूद, जरी लोकांच्या नजरेपासून दूर असली तरी, ती एक चित्रपट निर्माती आहे. तिने नागपूर विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. ती मूळची आंध्र प्रदेशची आहे आणि 1996 मध्ये तिचे सोनू सूद याच्याशी तिचा विवाह झाला आहे. या जोडप्याला अयान आणि ईशान ही दोन मुले आहेत.
दरम्यान, नकारात्मक भूमिकांमध्ये प्रभावी कामगिरी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनू सूदला कोविड-19 साथीच्या काळात त्याच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी देशभरात लोकप्रियता मिळाली. सार्वजनिक उपस्थिती असूनही, त्याची पत्नी आणि मुले यासह त्याचे कुटुंब बऱ्याच प्रमाणात प्रकाशझोतात राहिले आहे.