सोलापूर (Solapur) येथील मंगळवेड्यातून (Mangalwedha) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. घरगुती वादातून मंत्रालयातील एका सचिवाने पत्नीवर गोळ्या झाडून गळफास घेत आत्महत्या केली आहे. विजयकुमार भागवत पवार (Vijaykumar Bhagwat Pawar) असे या सचिवाचे नाव आहे. गोळीबारात पत्नी जखमी झाली असून तिच्यावर सोलापूर मधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
विजयकुमार भागवत पवार हे मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. कौशल्य विकास विभागात कार्यरत असलेले पवार यांचा गुरुवारी (21 मार्च) रात्री पत्नीशी वाद झाला. त्या वादातून शुक्रवारी (22 मार्च) पहाटे त्यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
मात्र पत्नी सोनाली आणि विजयकुमार यांच्यातील वादाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान त्यांच्या पत्नीची पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. यामुळे पोलिसांना तपासकार्यात नक्कीच मदत होईल.