ST Bus | (Photo Credits: MSRTC)

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्‍या एसटी बसला अपघात झाला आहे. या बसचे मागचे चाक निखळले आणि गाडी पलटी झाली आहे. पण सुदैवाने या बसमधील कोणाच्याही जीवावर बेतलेला नाही. पण यामध्ये 7-8 जण जखमी झाले आहेत. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. ST Bus Accident: पसरणी घाटात बसचा अचानक ब्रेक फेल झाला, अपघातात एका महिलेचा मृत्यू .

सोलापूर मधून बस नांदेड कडे जाताना अपघात झाला आहे. सोलापुरातील उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि उलटी झाली. या अपघातामध्ये जखमींवर सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातानंतर एसटी बसेसच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एसटीच्या अपघाताची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात सोलापूर-लातूर बसलाही अपघात झाला होता. एसटी बस चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने एसटी थेट रोडच्या कडेला धडकल्याचं समोर आलं होतं. Free ST Bus Service: ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! आता 75 वर्षांवरील नागरिकांना ST ने मोफत प्रवास करता येणार; 'या' लोकांनाही मिळणार 50 टक्के सूट .

काही महिन्यांपूर्वी अशा खराब अवस्थेमधील एसटी बसचा व्हिडिओ वायरल झाला होता. यामध्ये बसच्या टपावरील पत्रा चक्क उडत असल्याचं पहायला मिळालं आहे.