Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. यातच विलेपार्ले (Vile Parle) येथील कोविड केंद्राजवळ रस्त्यावर दोन गाड्यांमध्ये नृत्य आणि संगीत वाजवल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली आहे. आरोपी हे अंधेरी उपनगरचे रहिवाशी आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत कारमध्ये फिरत असल्याचे आढळले. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि साथीच्या रोग अधिनियमांच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-Maharashtra Govt Guidelines #Unlock1: महाराष्ट्रात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, पहा कोणत्या गोष्टींसाठी सरकारने दिली परवानगी

पीटीआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.