विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील संघर्ष सर्वांनाच ठाऊक आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर हा संघर्ष तर अधिकच वाढला आहे. याचेच पर्यावसन आज सिंधुदुर्ग जिल्हा डीपीडीसी (Sindhudurg DPDC Meeting) बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात आज जोरदार शाब्दीक चकमक (Narayan Rane-Vinayak Raut Clash) पाहायला मिळाली. एका मुद्द्यावरुन विनायक राऊत यांनी बैठकीत प्रश्न विचारला. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियम सांगण्याचा प्रयत्न केला. यावर तुम्ही पालकमंत्री आहात का? असा थेट सवाल राऊत यांनी केला. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.
महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात डीपीडीसी सभा प्रदीर्घ काळ रखडली होती. कालांतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप अशा युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आज (4 नोव्हेंबर) ही सभा पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या या सभेच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. Sanjay Shirsat On Sushma Andhare: 'माझ्यात हिम्मत आहे, मी लाचार नाही होणार', सुष्मा अंधारे यांच्या वक्तव्यावर आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
ट्विट
डीपीडीसी बैठकीत मंजूर होऊनही विकासकामांना कोणत्या कारणास्तव स्थगिती दिली? असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभेची सुरुवात सभेच्या अजेंड्यावरुनच होऊ दे. हा प्रश्न आयत्यावेळी घेतल्या जाणाऱ्या विषयांमधील असल्याचे सांगितले. त्यावरुन विनायक राऊत आक्रमक झाले. हा प्रश्न मी पालकमंत्र्यांना विचारला आहे. तुम्ही पालकमंत्री आहात काय? असा थेटच सवाल विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना विचारला. त्यानंतरत सभेत वातावरण तापले.