Shivbhojan Thali And Siddhivinayak Mandir (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या (Siddhivinayak Mandir Nyas)वतीने महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘शिवभोजन थाळी’ (Shivbhojan Thali) योजनेसाठी 5 कोटी रुपयांचे सहकार्य करणार आहे. ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवभोजन थाळीच्या उपक्रमातून राज्यातील गरिबांना सकस आहार अवघ्या 10  रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्याच्या या ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या महत्तवाकांक्षी उपक्रमाला पाठिंबा म्ह्णून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. अलीकडेच शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद पाहून ठाकरे सरकारतर्फे या थाळीच्या संख्या वाढवून दुप्पट करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती. अशातच अतिरिक्त भार सरकारच्या तिजोरीवर येण्याची पूर्ण शक्यता होती, या चिंतेला किंचित दूर करण्याचे काम सिद्धिविनायक मणिदर न्यासाकडून करण्यात आल्याचे म्हणता येईल.

प्राप्त माहितीनुसार, 18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे शिवभोजन थाळीच्या रोजच्या उपलब्धीमध्ये दुप्पट वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती, म्हणजेच यापुढे 18 हजाराच्या ऐवजी 36 हजार थाळ्या दिवसाला उपलब्ध करून देण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे. असे झाल्यास शिवभोजन केंद्रावर प्रतिदिन किमान 75 तर कमाल 200 थाळ्या उपलब्ध असतील असे समजतेय, वास्तविक या उपक्रमात मिळणाऱ्या थाळ्यांची मूळ किंमत ही 50 रुपये आहे मात्र गरीब जनतेसाठी केवळ 10 रुपायांमध्ये हे जेवण उपलब्ध करून देण्यात येते तसेच वरील अतिरिक्त भार हा सरकार तर्फे देण्यात येतो.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेच्या शिवभोजन थाळी प्रमाणेच भाजपकडून दीनदयाळ थाळी सुरु करण्यात आली आहे. जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त, भाजपने 'दीनदयाळ थाळी' योजना सुरू केली असून . 26 जानेवारी रोजी पंढरपूर येथून या योजनेचा प्रारंभ झाला आहे.