Shubhangi Patil | Twitter

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी आज (4 फेब्रुवारी) शिवसेना (Shiv Sena) पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधून घेतले आहे. शुभांगी पाटील यांचा आज मातोश्री वर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी संजय राऊत यांनी लवकरच शुभांगी पाटील यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाईल असं जाहीर केले आहे.

दरम्यान नाशिक पदवीधर निवडणूकीमध्ये मोठा ड्रामा बघायला मिळाला. कॉंग्रेसच्या सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता लेक सत्यजित तांबे याचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर त्याच्या विरूद्ध उभ्या असलेल्या शुभांगी पाटील यांना भाजपा कडून वेळेत एबी फॉर्म न दिल्याने अपक्ष म्हणून उभं रहावं लागलं. शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडी कडे मदत मागितली आणि त्यांनीही ती दिली परंतू त्यांना निवडून आणू शकले नाही. निवडणूकीत त्यांच्यासोबत 'राजकारण' झाले असले तरीही पराभवानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी 'झाशीच्या राणी सारखं लढू' असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

शुभांगी पाटील या महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांनी बीए. डीएड. एम.ए. बीएड. एलएलबी चं शिक्षण घेतलं आहे. 22 सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला होता. महाराष्ट्र स्टुडंटस असोसिएशनच्या त्या संस्थापक आहेत.

नाशिक मध्ये उद्धव  ठाकरे गटाचे ढासळते बुरूज पाहता पक्षाला उभारी देण्यासाठी सोमवारी आदित्य ठाकरे नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. देवळाली मध्ये त्यांची सभा देखील आयोजित करण्यात आली आहे.