
Shivaji Maharaj Jayanti 2019: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अहमदनगरचे अपक्ष नगरसेवक व माजी महापौर श्रीपाद छिंदम व, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 70 जणांना मंगळवारी अहमदनगर (Ahmednagar) शहरात प्रवेशबंदीची नोटीस देण्यत आली आहे. शहरातील तोफखाना पोलिसांनी 50, तर कोतवाली पोलिसांनी 10 जणांवर ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगर महापौर निवडणुकीदरम्यान श्रीपाद छिंदम यांना सेना नगरसेवकांकडून मारहाण
19 फेब्रुवारी, मंगळवार हा दिवस महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जयंती म्हणून साजरी केली जात आहे. या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला. सण-उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी एक दिवसाच्या मनाईचे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे दिले होते. यानुसार सोमवारी पोलिसांनी संबंधितांना प्रवेशबंदीच्या नोटिसा बजावल्या आहेत.
भिंगार कॅम्प पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियमातील 107च्या तरतुदींनुसार 10 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने छिंदमवर कारवाई करण्यात आली होती