Youth Died After Falling From A Local Train: धक्कादायक, लोकलमधून पडून आणखी एका तरुणाने गमावला जीव, दोन महिन्यात पाचवी घटना
A young man died after falling from a local PC Pizabay

Youth Died After Falling From A Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकराची लाइफलाईन आहे. पण यात लोकलने दोन महिन्यात चार तरुणाचा जीव घेतला आहे. त्यात शुक्रवारी आणखी एकाची भर पडली आहे. मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून घरी जात असताना एका तरुणाने जीव गमावला आहे. ही घटना 11 मेच्या सांयकाळी घडली आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. पोलिस याच्या कुटुंबाचा शोधात आहे. सततच्या वाढत्या घटना पाहून मुंबईकरांनी चिंता व्यक्त केली आहे. (हेही वाचा-  लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक; प्रवासाचे नियोजन करण्याआधी वेळापत्रक पहा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे जाणाऱ्या लोकलमधून मुंब्रा व कळवा स्थानकादरम्यान पडून तरुणाचा मृत्यू झाला. मुंब्रा व  कळवा येथील पारसिक बोगद्याच्या जलद मार्गावर तोल गेला. या घटनेनंतर लोकलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेची तात्काळ माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली.

रेल्वे सुरक्षा बलाचे सहपोलिस निरिक्षक रमेश तनजे आणि त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. तरुणाचे ओळख अद्याप समोर न आल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेतील गर्दीवर प्रशासनाने नियंत्रण मिळवावे अशी विनंती प्रवाशांनी केली आहे.