मनोरुग्ण पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जालना (Jalna) येथील अंबड (Ambad) तालुक्यातील रोहिलागड (Rohilagad) येथे रविवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मृत महिलेच्या पतीविरोधीत खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मृत महिलेचा पती गेल्या अनेक दिवसांपासून वेड्यासारखा वागत असल्याचे माहिती समोर आली आहे. तसेच या वेड्याच्या भरातच त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची समजत आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मंगलबाई सचिन टकले (वय, 35) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सचिन टकले गेल्या दोन महिन्यांपासून वेड्यासारखा वागत होता. दरम्यान, 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता आरोपी सचिनने घराचे दरवाजे बंद केला. त्यानंतर पत्नी मंगलबाई यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली आहे. याबाबत महिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अंबड पोलिसांनी मंगलबाई यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे, अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, एकंदर घटनास्थळाची परिस्थिती, मृत व्यक्तीचा पंचनामा, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले मृत दाखला, साक्षीदारांचा जबाब यावरून पतीनेच तिचा खून केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी सचिन टकले विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती टीव्ही9 मराठीने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- नाशिक: मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझर करताना आगीचा भडका उडाल्याने एका महिलेचा मृत्यू
कोरोनामुळे महााराष्ट्रातील नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच जालना येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीच्या संख्येत घट झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा गुन्हेगारीच्या वृत्तात भर पडू लागली आहे.