धक्कादायक! मुंबईतून २६ हजार हून अधिक मुली, महिला बेपत्ता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती
मुंबईत महिला, मुली गायब होण्याचे प्रमाण वाढत आहे (Archived images)

Winter session of Maharashtra Legislature: राज्य सरकारने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आकडेवारीवरुन धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही माहिती केवळ धक्कादायकच नव्हे तर, राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या काळात मुंबईतून तब्बल २६ हजार हून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मुली महिला गायब होण्याचे प्रामाण हे राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

२०१३ ते २०१७ मुली महिला बेपत्ता होण्याची आकडेवारी

एकूण बेपत्ता मुली आणि महिला - २६७०८

अल्पवयीन मुली - ५,०५६

बेपत्ता मुली, महिलांपैकी शोध लागलेल्या - २४,४४४

अद्यापही बेपत्ता - २,२६४

(*आकडेवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार)

(हेही वाचा, पॅटर्न लॉक विसरलात? तर अशा पद्धतीने करा अनलॉक)

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह सभागृहातील काही आमदारांनी मुंबईतून मुली आणि महिला बेपत्ता होण्याबाबच प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरात २०१३ ते २०१७ या कालावधीत मुंबईतून सुमारे २६ हजार महिला आणि मुली गायब झाल्या. त्यापैकी २,२६४ जणींचा शोध अद्यापही लागला नसून, तपास सुरु असल्याचे सरकारने म्हटले आहे.