प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोना विषाणूने संपूर्ण संकट वावरत असताना शेतकामासाठी गेलेल्या बापलेकांचा विद्युत तारेच्या धक्काने मत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूर (Kolhapur) येथील पन्हाळा (Panhala) तालुक्यात आज घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांच्या शेतात 11 किलोवॅटची विद्युत वाहिनी गेली आहे. या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वडिलांना विजेचा झटका लागला. दरम्यान, त्यांच्या मुलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र. त्यामुळे या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबियातील दोघांचा मृत्यू झाल्याने संबधित कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच अक्षयतृतीयेच्या सणादिवशी ही घटना घडल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.

बाबासाहेब पांडुरंग पाटील (वय 48) आणि राजवर्धन (वय 16) अशी मृतांची नावे आहेत. बाबासाहेब हे आपल्या कुटुंबसमवेत कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे वास्तव्यास आहेत. बाबासाहेब आणि राजवर्धन हे दोघेही सकाळी वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते. मात्र, बाबासाहेब शेतातून 11 किलोवॅटची विद्युत वाहिनी गेली आहे. विद्युत खांबाचा ताण काढण्यासाठी स्वतंत्र दुसऱ्या तारेचा वापर करून ती शेतात रोवली आहे. या तारेला स्पर्श होवून बाबासाहेब पाटील यांना शॉक बसला. हे पाहून त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा राजवर्धन तातडीने धावला. त्यामुळे या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात आज आणखी 440 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आकडा 8068 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती

या घटनेत बाबासाहेब यांचे दोन्ही पाय पूर्णत: जळून गेले होते. त्याचबरोबर राजवर्धनही खूप भाजला होता. यामुळेच बाबासाहेब आणि राजवर्धन यांचा मृत्यू झाला आहे. बाबासाहेब पाटील हे मुळचे उत्रे पन्हाळा तालुक्यातील रहिवासी आहेत. माले गावचे जावई असलेले पाटील हे लग्नानतंर कायमस्वरूपी येथे राहण्यास आले होते.