सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रातही 5 टप्प्यांत मतदान होणार असून राज्यासाठी ही निवडणूत अत्यंत अटीतटीची राहणार आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (हेही वाचा - Maharashtra Key Constituency: बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना, नाशिकमधला सस्पेंस कायम)
निवडणूक आयोग सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते अशी शंका लोकांच्या मनात आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकातून या निवडणूक आयोगाने या शंकांचं निरसन करावं. निष्पक्ष पद्धतीने, स्वत्रंत्रपणे या निवडणुकीचं नियोजन व्हावं. कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ आणि पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे”, असा सल्ला आपल्या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी दिला.
जनतेसहित आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही तरीही आम्ही निवडणुकांना सामोरे जातोय. मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. जेव्हा टीएन शेषन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते, तेव्हा त्यावेळी जनतेला विश्वास होता की निवडणुकांत घोटाळा, चोऱ्यामाऱ्या होणार नाही. पण आज आयोगावर जनतेला शंका आहे. या देशात खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही, याकडे जग डोळे लावून बसलंय. त्यामुळे पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी मोदी देऊ शकतील का? असा सवाल राऊत यांनी विचारला.