Shivsena MLA Disqualification Case:  ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी संपली, तब्बल 318 प्रश्न विचारले
Rahul Narwekar | (Photo credit: archived, edited, representative image)

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी (Shivsena MLA DisqualiFication Case) अखेर आज संपली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या दोन आठवड्यापासून ही सुनावणी सुरू होती. 7 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन हे होणार आहे यापुर्वी ही सुनावणी महत्त्वाची आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सुनील प्रभू यांची उलटतपासणी पुर्ण झाल्यानंतर शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयाचे सचिव यांचीही उलट सुनावणी झाली. (हेही वाचा - Nagpur Winter Session: राज्यात सरकारला घेरण्यासाठी व्यूहरचना, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर पार पडली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक)

दोन आठवड्यापासून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होती. अखेर आज ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची उलट साक्ष पुर्ण झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून सुनील प्रभूंना तब्बल 318 प्रश्न विचारण्यात आले. एकनाथ शिंदेंचे बंडावेळीचा संपूर्ण घटनाक्रमावरुन प्रश्न विचारुन सुनील प्रभूंची कोंडी करण्याचा प्रयत्न महेश जेठमलानींकडून झाला परंतू सुनिल प्रभू यांनी जशास तसे उत्तर यावेळी दिले.

एकनाथ शिंदेंना बनावट आयडीवर मेल पाठवल्याचा आरोप शिंदे गटाने केला तर शिंदेंचा आयडी खरा होता, त्यावरच मेल पाठवल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला.