Rahul Narvekar

महाराष्ट्राच्या राजकारणातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार अपात्रेचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदे गटातील 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 40 आमदारांसह ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवली होती. या नोटीसीवर दोन आठवड्यात असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दिले होते. (हेही वाचा - Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut: हिंदुत्त्व, गद्दारी ते देवेंद्र फडणवीस यांच्या 'कुटनीती' वर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल)

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निकाल दिला आहे. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी रिजनेबल टाईमध्ये घ्यावा असे देखील सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवरकर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.