डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर (Dr. Archana Patil Chakurkar) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. डॉ. अर्चना या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या स्नुषा आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मुंबई येथील भाजप कार्यालात पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक 2024 च्य पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. ज्यामुळे लातूल जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
डॉ. अर्चना शैलेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा पाठिमागील अनेक दिवसांपासून होती. अलिकडेच बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुरुमकर हे शिवराज पाटील चाकुरकरांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या कर्टर समर्थकाचा भाजप प्रवेश म्हणजे भविष्यातील चाकुरकर किंवा त्यांच्या कुटुंबातील काहींचा भाजप प्रवेश असे राजकीय अर्थ काढला जात होता. आजच्या पक्षप्रवेशामुळे हा अर्थ आणि त्याबाबतची चर्चा वास्तव होती हे स्पष्ट झाले आहे. या पक्षप्रवेशामुळे लातूर ,धाराशिव, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये मठ्या राजकीय घडामोडी घडणार असे मानले जात आहे. खास करुन शिवराज पाटील चाकूरकर यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे हे मतदान भाजपच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल, असे मानले जात आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय)
आपले सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेस पक्षात विविध पदांवर काम केले. अनेक वर्षे ते केंद्रीय राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे त्याचा फायदा माझ्या जडणघडणीत मोठ्या प्रमाणावर झाला. खास करुन देशातील आणि जगभरातील अनेक प्रतिभावान महिलांना मला जवळून पाहता आले. त्याचा उपयोग करुन मला सामाजिक कार्यात अधिक योगदान देता आले. माझा राजकारणात येण्याचा कधीच विचार नव्हता. मात्र, आता मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटले. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: वसंत मोरे यांनी घेतली VBA chief Prakash Ambedkar यांची मुंबईत भेट!)
व्हिडिओ
LIVE |📍मुंबई | जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम (30-03-2024)
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 30, 2024
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये यावे यासाठी आम्ही अनेक वर्षे प्रयत्न करत होतो. लोकसभा नवडणूक 2019 मध्ये तर आम्ही त्यांना थेट लोकसभा तिकीट द्यायलाही तयार होतो. मात्र, त्यांच्याकडूनच विलंब होत होता. अखेर तो दिवस आला त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पाटील चाकूरकर यांच्या पक्षप्रवेशावेळी सांगितले.