Shiv Sena,Narendra Modi | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (Army Chief, General Manoj Mukund Naravane) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि पर्यायाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हा निशाणा साधताना 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) ‘तुकडे-तुकडे गँग’ (Tukde Tukde Gang) वर भाजपाचा रोष आहे. त्यामुळे देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा 'तुकडे-तुकडे' गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नाकाशाचा जाळ उठवला पाहिजे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा पाकव्याप्त कश्मीरसंर्दभात लष्कराला आदेश देऊन धडा शिकवा, हाच उत्तम मार्ग आहे, असे सांगत शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे.

केंद्र सरकारवह हल्ला चढवताना शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयात म्हटले आहे की, 'जनरल नरवणे म्हणतात, हिंदुस्तानच्या संसदेने फेब्रुवारी 1994 व त्या आधाही असा ठराव केला आहे की, पाकव्याप्त कश्मीरसह संपूर्ण जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकिस्तानने कश्मीरवरील बेकायदेशीर ताबाब सोडून द्यावा. संसदेचा असा ठराव असल्याने केंद्राने आदेश द्यावेत. लष्कर घुसवून पाकड्यांचे कंबरडे मोडून गाढू व संपूर्ण कश्मीरचा ताबाब घेऊ असे त्यांचे म्हणने आहे. जनरल नरवणे हे केंद्राकडे लष्करी कारवाईचा आदेश मागत आहेत व पंतप्रधान मोदी यांनी असे आदेश द्यावेत अशी देशभावना आहे. सर्जिकल स्ट्राईकचा बार उडवल्यावर प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी व भाजपचे सगळेच नेते बुलंद आवाजात सांगत होते, देशवासियांनो, आता पुढचे लक्ष्य पाकव्याप्त कश्मीर आहे बरं का! आता जनरल नरवणे सरकारच्या त्याच भूमिकेची 'री' ओढत आहेत.' (हेही वाचा, संजय राऊत यांनी 'छपाक' आणि 'तान्हाजी' साठी दर्शवले समर्थन; भाजप गुंडगिरी करत असल्याची केली टीका)

न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे आमच्या लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. तुकडे-तुकडे गँगला धडा शिकविण्याचा हाच उत्तम मार्ग आहे.