'आरे'तील वृक्षतोडीचा आदित्य ठाकरे यांच्याकडून निषेध; मेट्रो अधिकाऱ्यांना झाडांऐवजी पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवादी तळ नष्ट करायला पाठवण्याचा दिला सल्ला
Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी आरे जंगल (Aarey Forest) संदर्भात मेट्रो-03 (Metro-03) बाजूने निर्णय दिल्याने पर्यावरण प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. यातच शिवसेना (Shivsena) पक्षाचे युवानेता अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आरे परिसरातील हजारो झाडांची तोडणी करण्यात येणार असल्यामुळे स्थानिक लोकांनी मेट्रो- 03 च्या कारशेड विरोध दर्शवला होता. आरेतील वृक्ष तोडी थांबण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी अंदोलनदेखील केले होते. या विषयावर बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरेतील झाडे तोडत आहेत, ते पाहून त्यांना पाकव्यात काश्मीर मध्ये पाठवायला हवे. याआधीही अदित्य ठाकरे यांनी मेट्रो ३च्या संदर्भात विधान केले होते. त्यावेळी म्हणाले होते की, आमचा विकासाला विरोध नसून पर्यावरणाला धोका पोहचवणाऱ्या मेट्रो-03 च्या कारशेडला आहे.

आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच प्रशासनाने आरे येथील नियोजित कारशेडच्या परिसरातील झाडे तोडण्यास सुरुवात केली. यावर अदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे. ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे कॉलनीतील झाडांची तोडणी करत आहेत, ते पाहून त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवे. येथील झाडे तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरे होईल ना?" असा प्रश्न अदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. हे देखील वाचा- Aarey Forest: आरे जंगलात मुंबई पोलिस आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संघर्ष पेटला, शेकडो आंदोलक ताब्यात

अदित्य ठाकरें यांचे ट्वीट-

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो कार शेडसाठी आरे जंगलात वृक्षतोडीविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा झाडे कापण्यास सुरूवात झाली. एका रात्रीच शेकडो झाडे कापण्याचा निर्णय घेतल्यानंतर पर्यावरण प्रेमींनीदेखील आरे जंगलात धाव घेतली. मात्र पोलिस सुरक्षेमध्ये झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याने या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.