Sanjay Raut On MVA Seat Sharing: चर्चा झाली पण निर्णय नाही? महाविकासआघाडीच्या जागावाटप बैठकीबद्दल काय म्हणाले संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जोरदार खलबतं सुरु आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीमधील शिवसना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षात आज महत्त्वाची बैठक झाली. उल्लेखनीय म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यात पार पडलेल्या या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर नेमका निर्णय काय झाला याबाबत सर्वांनच उत्सुकता होती. मात्र, बैठकीत सहभागी असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विशेष असे कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे बैठकीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यातच चर्चा झाली पण निर्णय नाही, असेही बोलले जाऊ लागले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महाविकास आघाडी (MVA) च्या घटक पक्षांमध्ये चांगली चर्चा झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. जागावाटपही ठरले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. गरज पडल्यास त्यांच्याशी पुन्हा एकदा भेट घेऊन चर्चा केली जाईल, असे राऊत म्हणाले.

व्हिडिओ

केवळ महाविकासआघाडीच नव्हे महायुतीकडूनही जोर-बैठका सुरु आहेत. जागवाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीचेही घोडे अडले आहे. खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जागावाटपाबाबत केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या गोटात सावध पावले टाकली जात आहेत. भाजप हा महायुतीतील सर्वा मोठा पक्ष असल्याने तो काय निर्णय घेतो याबाबत उत्सुकता आहे. प्रामुख्याने शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा सोडाव्यात यााबत अजूनही अंतिम निर्मय झाला नाही.

व्हिडिओ

प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या वृत्तानुसार, अजित पवार गटाने सरकार स्थापन करण्यापूर्वी भाजपने दिलेला शब्द पाळावा अशी मागणी केली आहे. तसेच, त्यांचे नेत छगन भुजबळ यांनीही शिवसेना जेवढ्या जागा लढवेन तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसही लढवेन, अशी भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप मित्रांना किती जागा सोडण्यास राजी होतो याबाबतही उत्सुकता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले असून महायुतीमधील तिन्ही नेत्यांसोबत चर्चा झाली. दरम्यान, तोडगा न निघाल्याने केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांन दिल्लीला बोलावले आहे. याचाच अर्थ महायुतीचे जागावाटप दिल्लीतून जाहीर होईल, असे मानले जात आहे.