Paithan Vidhan Sabha Election 2024 Result: मराठवाड्यातील महत्त्वाची समजली जाणाऱ्या पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) खासदार संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे (Vilas Bhumre) व दत्तात्रय गोरडे (Dattatreya Gorde) यांच्यात जोरदार लढत असून विलास भुमरे यांची आघाडी कायम असताना दिसत आहे. रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. कामाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यामुळे विलास भुमरे यांच्याशी युवा तरुण जोडला गेला.
निवडणुकीच्या प्रचारात देखील विलास भुमरे यांनी चांगली मोट बांधली होती. परंतु मतदानाच्या तीन दिवस अगोदर वेळेवर जेवण न केल्याने त्यांना भोवळ आली आणि खाली पडले. यात त्यांच्या एका हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झाले. त्यानंतर विलास भुमरे यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना जनतेकडून एक प्रकारची सहानुभूती देखील मिळाली, असे म्हणायलाही हरकत नाही. (हेही वाचा -Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: चौथ्या फेरीअखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर; राम शिंदे आघाडीवर)
विलास भुमरे यांच्या कामामुळे आणि प्रचार यंत्रणेमुळे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, विलास भुमरे यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दत्तात्रय गोरडे हे एकेकाळी संदिपान भुमरे यांचेचं निकटवर्ती होते. परंतु त्यांनी भुमरे यांची साथ सोडून स्वतःची वेगळी यंत्रणा तयार केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 15 हजार मतांनी संदिपान भुमरे यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला होता.