Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: चौथ्या फेरीअखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर; राम शिंदे आघाडीवर

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत आहे. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार या मतदारसंघांमध्ये निवडून आले होते. मात्र, यावेळी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: चौथ्या फेरीअखेर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार पिछाडीवर; राम शिंदे आघाडीवर
Rohit Pawar, Ram Shinde (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम, फेसबुक)

Karjat Jamkhed Vidhan Sabha Election 2024 Result: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed Vidhan Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते रोहित पवार चौथ्या फेरी अखेर 3900 मतांनी पिछाडीवर आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत आहे. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार या मतदारसंघांमध्ये निवडून आले होते. मात्र, यावेळी रोहित पवार यांच्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, चौथ्या फेरी अखेर रोहित पवार पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

रोहित पवार यांच्या प्रचारासाठी त्यांचे आजोबा शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या होत्या. या प्रचारसभांमधून शरद पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला होता. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अहिल्याबाई होळकर घराण्याचे वंशज राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात लढत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे कर्जत- जामखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. (हेही वाचा -Maharashtra Assembly Election 2024 Result: सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची आघाडी कायम)

राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात काटे की टक्कर -

सध्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर अशी परिस्थिती आहे. भाजपाचे राम शिंदे हे देवेंद्र फडणीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या देखील सभा कर्जत जामखेड मध्ये झाल्या होत्या. यामध्ये कर्जत जामखेडच्या मतदारांना फडणवीस यांनी राम शिंदेंना निवडून आणल्यास त्यांना चांगली जबाबदारी देऊ, असा शब्द दिला होता.

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).