राज्यातील 11 कोटी जनता शिवाजी महाराज यांची वंशज: संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credits-ANI)

राज्यातील 11 कोटी जनता शिवाजी महाराज यांची वंशजच आहे. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या विश्वाचे दैवत आहेत आहे. आम्ही महाराजांसमोर नेहमीच नतमस्तक होतो. हे आमचं कर्तव्य आहे. देशात केवळ महाराष्ट्राला इतिहास आहे. इतरांना भूगोल आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे आम्हाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात ज्ञान देऊ नये. त्यांनी आगोदर स्वत:चे आंतरंग तपासून पाहावे, असा टोला भाजपला लगावत शिवसेना (Shiv Sena)  खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावत आपल्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तरही दिले आहे.

उदनयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत या विधानावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोल्हापूर, सातारा किंवा इतर ठिकाणी असलेल्या अशा सर्वच गाद्यांविषयी आम्ही सदैव आदर राखला आहे. या गाद्यांसमोर नतमस्तक होणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, कार्यकर्ते यांच्याविषयी काहीही बोलायचे आणि आम्ही ते ऐकून घ्यायचे असे कसे चालेल. लोकशाही आहे. प्रश्न विचारण्याचे आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा सर्वांना हक्क आहे. शिवसेना स्थापन करताना वंशजांना विचारले होते काय? असे उदयनराजे यांनी विचारले. पण, उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पना राजे या शिवसेना उमेदवार होत्या. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे सदगृहस्थ आहेत, आमचे व्यक्तिगत मित्र आहेत, अत्यंत संयमी आहेत. त्याच्याबद्दल मला कायम आदर आणि प्रेम आहे. कोल्हापुरच्या महाराजांनीही शिवसेनेचे कार्य सुरु केले होते, असा दाखला देत संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिले. (हेही वाचा, 'ही तर छत्रपतींच्या विरोधात बोलणारी मुघलांची औलाद' भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल)

या वेळी बोलताना लोकशाहीत तुम्ही कोणीही असाला तरी, तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नव्हे. तंगड्या सर्वांना असतात. लोकशाहीत कोणत्याही प्रकारे अशी भाषा योग्य नव्हे, असेही संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना ठणकाऊन सांगितले.