
शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आज अंमलबजावणी संचालनालय अर्थाच ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी प्राप्त झालेल्या नोटीशीनुसार संजय राऊत मुंबई येथील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना अवाहन केले की, कोणीही ईडी कार्यालयाबाहेर जमू नये. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी घाबरणारा व्यक्ती नाही. मी ईडी (Sanjay Raut ED News) चौकशीला सामोरा जाईन. माझा ई़डीवर पूर्ण विश्वास आहे.
संजय राऊत यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ' मी एक निर्भय व्यक्ती आहे. मी निर्भय आहे कारण मी माझ्या आयुष्यात कधीही चूक केलेली नाही. हे सर्व राजकीय असेल तर ते नंतर कळेल. सध्या, मला वाटते की मी तटस्थ एजन्सीकडे जात आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे'. (हेही वाचा, Sanjay Raut on Eknath Shinde Group: शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाही, सत्तेचा जन्म शिवसेनेसाठी झाला आहे; संजय राऊत यांची प्रतिक्रिया)
संजय राऊत यांनी ईडी कार्यालयात जाताना सांगितले की, ही कारवाई पूर्णपणे राजकीय हेतून प्रेरीत आहे. चौकशीनंतर हे पुढे येईलच. केंद्रीय यंत्रणेने मला चौकशीसाठी बोलावले आहे. पण, मी आपल्याला सांगतो की, मी एकनागरिक आहे. त्यासोबतच खासदारही आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जाईन. या वेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबाही दिला. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप सांगत होती की ते आम्हाला परेशना करतील. पण माझे त्यांना सांगणे आहे की, त्यांनी सरकारसाठी काम करावे. (हेही वाचा, Sanjay Raut on Eknath Shinde Group: शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झालेला नाही, सत्तेचा जन्म शिवसेनेसाठी झाला आहे; संजय राऊत यांची प्रतिक्रिया)
संजय राऊत यांनी आपले ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टॅग केले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेपुढे उभा राहिल्याचा फोटोही शेअर केला आहे. संजय राऊत यांना पाठीमागील मंगळवारीच ईडी कार्यालयात बोलावणे आले होते. मात्र, त्यांनी 13-14 दिवसांचा वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर मात्र ईडीने वेळ वाढवून देण्यास नकार दिला. संजय राऊत यांची मुंबईतील पत्रा चाळीसंदर्भात चौकशी सुरु आहे.