'काळजीवाहूं'ना बांधून ठेवलेल्या सामानावर बसून कारवाया करता येणार नाहीत; देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा टोला
Devendra Fadnavis | (Photo credit : facebook)

शिवसेना मुखपत्र (Shiv Sen Mouthpiece) दै. सामना (Dainik Samana) संपादकीयातून आज पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. या संपादकीयात शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'काळजीवाहू सरकार फक्त वर्षावर आहे. बांधून ठेवलेल्या सामानावर बसून त्यांना उलटसुलट कारवाया करता येणार नाहीत. पाच वर्षांतून भयंकर स्थितीतून महाराष्ट्र गेला आहे. जनतेच्या मनाप्रमाणेच घडावे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांना टोला लगावला आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये जनतेचा स्पष्ट जनादेश आला असतानाही मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाचे कारण ठरला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.

सामना संपादकीयामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपुष्टात आली. या काळात कोणतेही सरकार स्थापन झाले नाही त राष्ट्रपाती राजवट लागू होईल वैगेरे 'भयपट' दोखवले जात असले तरी त्यात तथ्य नाही. फडणवीस यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यापालांकडे सोपवला आहे. नवीन पर्यायी व्यवस्था होईपर्यंत राज्यपालांनी त्यांना 'काळजीवाहू' मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे. नवी राज्यव्यवस्था होईपर्यंत मावळत्या मुख्यमंत्र्यांचे सामानसुमान 'वर्षा' बंगल्यावर राहू शकते. ते 'काळजीवाहू' या बिरुदावलीने तिथे थांबतील, पण किती दिवस याचा निर्णय राज्यपालांना घ्यावाच लागेल. कारण, काळजीवाहू सरकारला थोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत, पोलिसांना आदेश देण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे काळजीवाहूंचे कार्यकर्ते म्हणून बड्या पोलीस अधिकाऱ्यांना काम करता येणार नाही. असे कोणी करत असतील त्यांनी भविष्याचे भान ठेवावे हे आम्ही आजच बजावत आहोत. प्रशासकीय यंत्रणा एखाद्या व्यक्तीची, राजकीय पक्षाची गुलाम असू नये. प्रशासन हे राज्यनिष्ठ असते. याचे भान राहणे गरजेचे आहे. राज्याची स्थिती अस्थिर आहे. पण ही अस्थिरता लवकरच संपेल व शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मनातील रयतेचे राज्य येईल. (हेही वाचा, राज ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचेही 'लाव रे तो व्हिडिओ')

दरम्यान, राष्ट्रपती राजवट म्हणजे काही संकट नाही. 9 तारखेनंतर सरकार स्थापनेची हालचाल राज्यपाल सुरु करतील. सर्वात मठ्या पक्षाला ते सरकार स्थापनेसाठी बोलवू शकतात. भाजपने ही संधी दवडू नये, पण सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढाकार घेत नसतील तर तो त्यांचा प्रश्न. शिवसेनेशिवाय आम्ही राजय स्थापन करु शकत नाही असे त्यांचे नेते राज्यपालांना भेटून आल्यावर सांगतात. हे त्यांचे प्रेम उतू चालले आहे. सत्यप्रकाशाचा उजेड त्यांच्या जीवनात त्यांच्या जीवनात पडला आहे, की नवे 'पेच' गोड बोलून टाकले जात आहेत. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन करु हे ठीक, पण निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत जे सत्तास्थापनेचे ठरले होते त्यावर त्यांच्या मुखातून शब्द निघत नाही. पुन्हा 'असं बोललोच नाही', 'असा शब्द दिलाच नाही' असे सांगतात. या शब्दांच्या फिरवाफिरवीचा या बनवाबनवीचा आम्हाला वीट आला आहे. व जनतेलाही उबग आला आहे. शिवसेनेशिवय सरकार बनणार नाही. पण शिवसेनेबरोबर जे ठरले होते त्यावर मागे हटायचे हे कसले राजकारण? असल्या भंपक राजकारणाचा चिखल आम्ही आमच्या अंगास लावून घेऊ इच्छित नाही. आम्हाला स्वच्छ, नितळ, शब्दाला जागणारे राजकारण करायचे आहे. शेवटी कोणी कोणत्या मार्गाने सत्ता मिळवायीच हा त्यांचा प्रश्न. आम्ही आमचा स्वाभिमानाचा मार्ग पकडू, असेही उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयात म्हटले आहे.