राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्ते भाविनक झालेले पहायला मिळाले. शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्षात असणारच आहे, फक्त पदावर असणार नाही एवढंच म्हटलंय, असे ते म्हणाले. यावेळी कार्यकर्ते भावूक झालेले पहायला मिळाले त्यावेळी त्यांना धीर देण्याचे काम राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी केलेले पहायला मिळाले.
"Let us all work together, but accept my resignation," says Sharad Pawar to party workers opposing his resignation pic.twitter.com/Fs6gEbFF1k
— ANI (@ANI) May 2, 2023
शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्रपर पुस्तकाचं प्रकाशन आज होते या कार्यक्रमात शरद पवारांनी ही घोषणा करत सर्वांना एक धक्काचा दिला. या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाल्याचं बघायला मिळालं.