Udayan Raje and Shivendra Raje (Photo Credits: Facebook)

साताऱ्यामध्ये (Satara) आमदार शिवेंद्रराजे (Shivendraraje) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)  यांच्यादरम्यान असलेला वाद आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला आहे. आगामी काही दिवसातच लोकसभेच्या (Lok Sabha) तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षांतर्गत (NCP) असलेले वाद मिटवण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ देखील उपस्थित होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आमदार शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये वाद होते. मागील काही दिवसांपासून उदयनराजे यांनी एकला चलोची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट देऊ नये अशी काही स्थानिक आमदारांची मागणी होती. मात्र शरद पवार यांनी दोन्ही नेत्याची दिलजमाई करून एकत्र काम करण्याचा सल्ला दिला आहे. उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षासोबत काम करावे, विधानसभा निवडणुकीमध्ये मदत करावी अशी साताऱ्यातील आमदारांची मागणी होती.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची दिलजमाई झाल्याने आता साताऱ्यामधून राष्ट्रवादीकडून उदयनराजे लोकसभेसाठी उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.