राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. देशातील आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. नोटबंदीने काय झाले? देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली. श्रीलंका आणि पाकिस्तानातील अर्थव्यवस्था चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी धोरण ठरवताना काळजी घ्यायला हवी. राज्यातील जनता सुजाण असते. आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शाहणा असतो. तो योग्य वेळी धडा शिकवतो. याचे उदाहरण द्यायचे तर इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावली. लोकांना वाटलं राज्य धोक्यात आले आहे. लोकांनी इंदिरा गांधी यांच्या हातातून सत्ता काढून घेतली. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. पण लोकांच्या लक्षात आलं हे राज्य व्यवस्थित चालवत नाहीत. त्यांनी त्यांच्याही हातातील राज्य काढून घेतले आणि इंदिरा गांधी यांच्या हाती सोपवले, अशी आठवणही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.
शरद पवार यांनी एका भाषणात जवाहर राठोड यांच्या कवितेचा दाखला देत काही ओळी उच्चारल्या होत्या. नेमका तेवढाच व्हिडिओ महाराष्ट्र भाजपच्या (BJP) ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला. शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले अशा आशयाची टीकाही शरद पवार यांनी केली. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी थेट कविताच वाचून दाखवली. शरद पवार यांनी कवीता वाचल्यावर सांगितले की, जवाहर राठोड यांनी कवितेच्या माध्यमातून कष्टकरांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न राठोड यांनी केला असल्याचेही सांगितले. (हेही वाचा, शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा)
दरम्यान, महाविकासाघाडी सरकार स्थानिक स्वाराज्य संस्थांमध्ये एकत्र निवडणूका लढवतील. परंतू काही प्रश्न असतील तर त्याबाबत आमचे सहकारी स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतील, असेही शरद पवार म्हणाले.