माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार (Photo Credit : ANI)

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अनपेक्षित घटना घडू लागल्या असून राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या निर्णयामुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची आज मुंबईत (Mumbai) दुपारी 4:30 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत शरद पवार कोणती भुमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अजित पवारांच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्यामुळे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

एएनआयचे ट्वीट-