Sharad Pawar | (Photo Credits-Twitter)

गेल्या कित्येक दिवसांपासून ईव्हीएम (EVM) मशीन बाबत केल्या जाणा-या चर्चांना दुजोरा देत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pwar) ईव्हीएम मशीनबाबत एक खळबळजनक आरोप केला आहे. घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिले, असा आरोप शरद पवारांनी केलाय. साता-यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत चिंता व्यक्त केली.

ह्याचा अर्थ सगळ्याच ईव्हीएम मशीनमध्ये अशा प्रकारचा बिघाड असेल असं माझं म्हणणं नाही असंही ते यापुढे म्हणाले. हा सगळा प्रकार आम्ही कोर्टासमोरही आणला. मात्र आमचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही VVPAT मशीनमधल्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वी मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या त्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षाही मोठ्या होत्या असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने EVM-VVPAT संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली, विरोधकांना मोठा दणका

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Narendra Modi) यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हणणं गैर आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. एखादा माणूस हयात नसताना त्याबद्दल अशाप्रकारे बोलणं योग्य नाही.