करवीर नगरी कोल्हापुरामध्ये आज (26 जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांचा 146 वा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. दरवर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात मिरवणूका निघतात, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सोहळे साजरे होतात. मात्र यंदा या सेलिब्रेशनला कोरोना व्हायरसमुळे ब्रेक लावण्यात आला आहे. आज अत्यंत साधेपणाने लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून हा सोहळा साजरा करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूरचे संस्थानचे संभाजी छत्रपती, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्या अनेक मान्यवरांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सारे सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. Rajarshi Shahu Puraskar 2020: डॉ. तात्याराव लहाने यंदाचे 'राजर्षी शाहू पुरस्कार' चे मानकरी.
खासदार छत्रपती संभाजी राजे ट्वीट
महाराष्ट्राच्या समाजक्रांतीचा केंद्रबिंदू आणि राजर्षी शाहु छत्रपती महाराजांचे वास्तव्य असलेल्या नविन राजवाड्याच्या प्रांगणात असलेल्या लोकराजाच्या स्मारकास अभिवादन केले. pic.twitter.com/UW8LSupYVD
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 26, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार
सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तसंच राज्यातील जनतेला 'सामाजिक न्याय दिना'च्या शुभेच्छा! छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून याच विचारांवर आपल्या राज्याची वाटचाल सुरू आहे. pic.twitter.com/6YmiMeQpUw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 26, 2020
जयंत पाटील
साहित्य, कला, क्रिडा, शिक्षण, जलप्रकल्प उभारणी अशा विविध क्षेत्रांत अजोड कामगिरी करणारे, सुधारणावादी लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन🙏#ShahuMaharajJayanti #ShahuMaharaj pic.twitter.com/v4b7eHxBHL
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 26, 2020
CMO Tweet
रयतेचा राजा, थोर कल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! pic.twitter.com/QxdPDhgFNS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2020
बाळासाहेब थोरात
बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे, सामाजिक न्याय व आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/hAfCBQiOVQ
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 26, 2020
शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 साली कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्याचं मूळ नाव यशवंत असे होते. कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 1884 झाली यशवंत यांना दत्तक घेतले आणि त्याचं नावं 'शाहू' असे ठेवले. पुढे त्यांच्या राज्याभिषेकानंतर 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.