नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पदाफार्श; वेटरच्या वेशात होत्या सेक्स वर्कर
Sex Racket | Photo Credits: PTI

मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असताना नवी मुंबईत  (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबईतील ब्लू स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पदाफार्श करण्यात आला असून यातून एका एनजीओने पोलिसांच्या मदतीने 40 महिलांची सुटका केली आहे. धक्कादायक म्हणजे या हॉटेलमध्ये वेटरच्या म्हणून असलेल्या काही महिला या सेक्स वर्कर होत्या असेही तपासात दिसून आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनीं सापळा रचून हा सेक्स रॅकेट उघडकीस आणला. जेव्हा एक व्यक्ती ब्लू स्टार हॉटेलमध्ये जाऊन महिलेची मागणी करु लागला, तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी एका मुलीला जवळच्याच प्रिन्स लॉजमध्ये पाठवायचं कबूल केलं. त्या व्यक्तीला 5 हजार रुपये भरायला सांगण्यात आले. हे पैसे दिल्यानंतर ती व्यक्ती लॉजमध्ये गेली तेव्हा एक मुलगी तिथे वाट पाहत होती.

हेदेखील वाचा- घरातूनच सेक्स रॅकेट चालविणा-या 56 वर्षीय गृहिणीस चारकोप परिसरातून अटक

अशा पद्धतीने त्यांनी सापळा रचून या हॉटेलवर छापा टाकला. इतकेच नव्हे तर ज्या मुलीला त्यांनी पाठविले होते त्या मुलीकडून पोलिसांनी अशी माहिती मिळाली की, वेटर असलेल्या काही महिला या सेक्स वर्कर आहेत.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आणि या सेक्स रॅकेट काही आणखी धागेदोरे सापडतात का याचा तपास घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये असाच धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. जिथे  पती कामावर आणि मुलगी कॉलेजसाठी घराबाहेर पडताच त्या घरातील महिला घरातूनच सेक्स रॅकेट चालवायची, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाली . या प्रकरणी 56 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.