Sex Racket Busted in Navi Mumbai: नवी मुंबईतील तळोजा परिसरात चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेट (Sex Racket) चा नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) पर्दाफाश केला असून एका बांगलादेशी नागरिकासह दोन महिलांना 24 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेची सुटका केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सांगितले की, 'नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाला (एएचटीसी) निवासी भागातील एका घरातून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती मिळाली होती.'
पोलिसांनी सापळा रचवण्यासाठी एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवले. त्यानंतर आवारात छापा टाकला. यावेळी पोलिसांना हसीना मुशरफ खान (वय, 30) नावाची एक महिला सापडली, जी हे रॅकेट चालवत होती. सलिया सफिक खान (39) ने ग्राहकांकडून डिजिटल पद्धतीने पैसे घेण्यास सांगितले होते. या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा -Sex Racket in Thane: ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 5 महिलांची सुटका, 2 महिलांसह तिघांना अटक)
प्राप्त माहितीनुसार, हसीना मूळची बांगलादेशची असून अन्य आरोपी कोलकाता येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापी, सुटका करण्यात आलेल्या महिलेला मुंबईतील चेंबूर येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 143(2) (व्यक्तीची तस्करी), 3(5) (सामान्य हेतू) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा अंतर्गत गुन्हा तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Sex Racket Demolished In New Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! बेलापूरमधील अपार्टमेंटमध्ये सेक्स रँकेट चालवणाऱ्या महिलेला अटक; देहव्यापारास भाग पाडलेल्या मुलीची सुटका)
दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलने (एएचटीसी) मनीष उर्फ हुक्का किंग आणि त्याच्या महिला साथीदाराला अटक करून भिवंडीतील मोठ्या सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला होता. मुंबई, गोवा आणि ठाणे या भागात पसरलेल्या या ऑपरेशनमध्ये वेश्याव्यवसायाच्या विस्तृत जाळ्यासाठी हुक्का पार्लरचा वापर करण्यात आला होता. गेल्या 1-2 वर्षांपासून ग्राहकांना मुली पुरवणाऱ्या या तस्करांच्या तावडीतून 19 आणि 20 वर्षांच्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली होती.