ठाणे (Thane)  जिल्ह्यातून कल्याण (Kalyan)  जिल्हा वेगळा करा अशी मागणी भाजप आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांनी केली आहे. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या समोर किसन कथोरे यांनी ही मागणी केली. मात्र अशा पद्धतीने बैठकीत तसा ठराव करता येणार नाही असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पालघर (Palghar) जिल्हा वेगळा झाला तेव्हाच कल्याण  जिल्ह्यासाठीही मागणी करण्यात येत होती. मात्र तेव्हा या मागणीला फारसं यश आलं नव्हते. (हेही वाचा - Kalyan Lok Sabha Seat: उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करुन घेणार आढावा, श्रीकांत शिंदेविरोधात तगडा उमेदवार देणार)

ठाण्यातून पालघर जिल्हा वेगळा होत असतांना त्याच वेळेस कल्याण जिल्हाही वेगळा करावा अशी मागणी लावून धरण्यात आली होती. परंतु अद्यापही त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. कल्याण ते थेट कर्जत पर्यंत हा जिल्हा असावा असेही यात नमुद करण्यात आले आहे. कल्याण जिल्हा झाल्यास रेल्वेची सुविधा असल्याने येथील नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्या अनुषगांने ही मागणी करण्यात आली होती.

भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना राज्य सरकरची आहे. सध्या पालघरचे विभाजन करून जव्हार, ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे  या मागणीने जोर धरला आहे.