
Hari Narke Passes Away: ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. पाठिमागील काही काळापासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्राध्यापक म्हणून ते महाराष्ट्राला परिचीत होते. महात्मा फुले समता परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रिबाई फुले यांचे विचार आणि कार्य यांवर त्यानी विशेष काम केले. त्यांच्या जाण्याने राज्यातील पुरोगामी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
हरी नरके हे उभ्या महाराष्ट्राला लेखक, संशोधक, उत्तम वक्ते, पुरोगामी चळवळीचे सक्रीय कार्यकर्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून परिचीत आहेत. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापाठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासनाचे प्राध्यापक म्हणूनही ते सक्रीय होते. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील एक अभ्यासू चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असे. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा ही त्यांची दोन पुस्तके अतिशय लोकप्रीय ठरली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. शिवाय मराठी, संस्कृत, कन्नड, तेलुगू यांसह अभिजात भारतीय भाषांच्या संशोधनासाठी गठीत करण्यात आलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणनही हरी नरके यांनी अत्यंत महत्त्वाजी जबाबदारी पार पाडली होती.
महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील आधारवढ हरपला. इतका ज्ञानी, अभ्यासू आणि संशोधक वृत्तीचा माणूस आता आणायचा कोठून असा प्रश्न आम्हा सर्वांना पढला आहे. आमच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत, अशा शब्दांमध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून हरी नरके यांची प्रकृती ठिक नव्हती. मात्र, त्यांना इतक्या पटकन असे काही होईल अशी कल्पनाही कोणाला आली नव्हती. आम्हा सर्वांनाच त्यांच्या जाण्याने प्रचंड धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा आम्ही कसाबसा प्रयत्न करत आहोत, असेही भूजबळ यांनी म्हटले आहे.