Assembly Elections Results 2018 :  BJP ने आत्मपरीक्षण करावे - शिवसेना खासदार  संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

Assembly Elections Results 2018 in Marathi: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,मिझोराम,तेलंगणा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुक निकालांना सुरूवात झाली आहे. निवडणूक निकालाचे सुरूवातीचे कल पाहता सत्तांतर होण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणूक 2019 साठी हे मतदान निकाल म्हणजे मोदी सरकारची पूर्वपरिक्षा समजली जात होती. आज नरेंद्र मोदींनी या निकालांबाबत बोलणं टाळलं आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत या निकालांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

संजय राऊत यांच्या मते, हा कॉंग्रेसचा विजय नाही तर लोकांचा भाजपाविरूद्ध असलेला राग आहे. ही आत्मपरिक्षणाची वेळ असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सध्या संजय राऊत दिल्लीमध्ये उपस्थित आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेनेदेखील आगामी निवडणूकींमध्ये स्वबळावर निवडणूकांना समोरे जाण्यासाठी सज्ज असल्याच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे भारतातील पाच राज्यांमधील निकालाचा परिणाम महाराष्ट्रात आगामी निवडणुकीदरम्यान युतीवर होणार का? हे पाहणं आता उत्सुकतेचे ठरणार आहे.