महाराष्ट्रात (Maharashtra) अटोक्यात आलेल्या कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यात विविध शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाशिक महानगरपालिकेने महत्वाचा (Nashik Municipal Corporation) निर्णय घेतला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळा उद्यापासून येत्या 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, 5 ते 8 वीचे वर्ग बंद असून केवळ 10वी आणि 12 वीसाठी पालकांची संमती असेल तर, शाळा सुरू राहणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत चालली आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जात आहे. महत्वाचे म्हणजे, जर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. हे देखील वाचा- इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विषयनिहाय शंका समाधान कार्यक्रमाचे Scertmaha तर्फे आयोजन; पहा वेळापत्रक
महाराष्ट्रात आज 6 हजार 397 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 5 हजार 754 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 20 लाख 30 हजार 458 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77 हजार 618 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.94% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.