Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विषयनिहाय शंका समाधान कार्यक्रमाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (State Council of Educational Research and Training, Maharashtra) तर्फे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. आपण याविषयीचे वेळापत्रक https://maa.ac.in/index.php?tcf=counselling या संकेतस्थळावर पाहू शकता. या कार्यक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहनदेखील वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता 11 वी साठीची प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये इयत्ता 11 वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह) च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये तासिका / वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी सदरच्या लिंकवर आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. (वाचा - Maharashtra Board 10th and 12th Exam 2021 Timetable: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; HSC परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान, तर SSC परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे पर्यंत)

कोरोना प्रदुर्भावाच्या कालावधीमध्ये राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन , फोनच्या माध्यमातून संपर्क करून Community Classes किंवा घरी जाऊन तसेच गावातील सुशिक्षित तरुण, सरपंच, पोलीस पाटील, शिकलेल्या माता, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य “शिक्षक मित्र” बनून मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे सहकार्य करीत आहे. या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न करत आहेत याचीच माहिती संकलन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.