मुंबईतील (Mumbai) कुलाबा भागात असलेल्या ताज हॉटेलवर (Taj Hotel) 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorists Attack) केला होता. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी निष्पाप लोकांचे रक्त सांडले होते. या हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयाच्या मनात कायम आहेत. यातच ताज हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या 2 दहशतवाद्यांविषयी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने केलेल्या प्रॅन्क कॉलने पोलिसांना चक्रावून सोडले आहे. या संदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरला आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कॉल केला होता. यावेळी दोन अतिरेकी हॉटेलमध्ये प्रवेश करणार असल्याचा त्यांनी सांगितले. यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक आणि स्निफर कुत्र्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच इमारतीची तपासणी केली आणि सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, पोलिसांच्या चौकशी दरम्यान कळाले की हा फोन पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड येथील नववीच्या विद्यार्थ्याने केल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- International Day Against Drug Abuse चं औचित्य साधत Mumbai Police कडून नागरिकांना 'भानावर' आणण्यासाठी खास ट्वीट
ट्वीट-
A prank call by a schoolboy to Hotel Taj in Mumbai informing about two terrorists sent police into a tizzy on Saturday, an official said.@MumbaiPolice#Mumbai #TajHotel #Prankhttps://t.co/0M7WTuoUpp
— Outlook Magazine (@Outlookindia) June 26, 2021
मुंबईवर 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्ष उलटली आहेत. त्यावेळी मुंबईतील ताज हॉटेलसहीत 6 ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये 160 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले होते. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचे प्राण घेतले. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यामध्ये ताज हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते.