
मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत सारेच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांचा प्रवासाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी तासनतास ट्राफिकच्या रांगा आहेत. यामध्ये आता स्कूल बस चालकांनी जर रस्त्यांची दशा सुधारली नाही तर तात्पुरती स्कूलबस सेवा (School Bus Service) बंद करू असा टोकाचा इशारा दिला आहे.
स्कूल बस मालक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिलेल्या माहिती पुढल्या 8 दिवसामध्ये जर रस्त्याची अवस्था सुधारली नाही तर बससेवा बंद केली जाईल असं म्हटलं आहे. उद्या याबाबतची बैठक होणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेतला असं सांगितलं आहे. हे देखील नक्की वाचा: मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार; येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार - CM Eknath Shinde यांची विधानसभेत घोषणा .
एकीकडे सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यासाठी कडक नियमावली करते आणि दुसरीकडे रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना गाडी कशी चालवायची? असा प्रश्न स्कूल बस चालकांना पडला आहे. रस्त्यांत खड्ड्यांमुळे टायर पंक्चर झाला तरी ट्राफिक पोलिस तातडीने दंड ठोठावतात. खराब रस्त्यांमुळे मुलं शाळा आणि घरी उशिराने पोहचतात. यामुळे पालकही प्रश्न विचारतात पण अशा परिस्थितीमध्ये रस्त्यांची देखभाल करणार्या यंत्रणा मात्र त्याची जबाबदारी स्वीकारत नसल्याचं SBOA ने विचारलं आहे.
गर्ग यांनी आपली प्रतिक्रिया देताना खड्ड्यांमुळे बस सुरक्षित चालवणं हे देखील आव्हान असल्याचं म्हटलं आहे. बस मध्ये मुलं असताना खड्ड्यांमधून बस काढणं अनेकदा जिकरीचं होतं.