कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत (Gokul Election 2021) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने एकहाती विजय मिळवला आहे. गोकुळ दूधसंघातील महादवेराव महाडिक गटाच्या तब्बल 3 दशाकाच्या सत्तेला सतेज पाटील गटाने शेवटी सुरुंग लावला. या निवडणुकीत सतेच पाटील गटाचे 17 उमेदवार निवडून आले आहेत. तर, महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटाचे केवळ 4 उमेदवारांच्या हाती यश आले आहे. या निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर सतेज पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा विजय जिल्ह्यातील सर्वसामन्य दूध उत्पादकांचा आहे, असेही ते म्हणाले आहेत.
सतेज पाटील म्हणाले की, "सन्मानीय कै.आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या 17 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच हा संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती देण्यासाठी गेली 6 वर्ष संघर्ष करणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभार! आज खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती गेला. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या अपेक्षेप्रमाणे गोकुळ दूध संघ चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." हे देखील वाचा- Gokul Election Final Result 2021: गोकुळमध्ये अखेर सत्तांतर, सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा एकहाती विजय
ट्वीट-
हा विजय जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांचा!
सन्मानीय कै.आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या १७ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी (1/3) pic.twitter.com/qPRyJh0bBV
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) May 4, 2021
दरम्यान, गोकुळ दूधसंघात प्रतिदिन सुमारे 30 ते 35 लाख लिटर दूध संकलन होते. त्यामुळे सहाजिकच दूधसंघाचा विस्तार जिल्हाभर आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळ दूध वितरीत केले जाते. दूधसंखाचा व्याप मोठा आहे. वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या दूधसंघास जिल्ह्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघातच गेल्या काही वर्षात पडला आहे. परिणामी गोकुळ दूधसंघ निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.