Satara News: साताऱ्यात जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

सध्या राज्यात तापामानात चांगलीच वाढ होत चालली आहे. अशा वेळी अनेक जण जलाशय किंवा नदीमध्ये पोहायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच पाण्यात बुडण्याच्या दुर्घटना देखील वाढत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला वाळणे (ता महाबळेश्वर)गावात ही दुर्दैवी घटना घडली. (हेही वाचा -  Mumbai Boys Drown: मुंबईत माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु)

12 ते 13 वयोगटातील चार मुली आज रविवारी दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या . पोहत असताना त्यातील तिघी बुडाल्या.यावेळी मुलींनी व लगतच्या लोकांनी आरडाओरडा केला. यावेळी गावकरी मंडळी जमा झाली. त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला .  यावेळी एकीचा जागी मृत्यू झाला. तर तिघीना उपचारासाठी तापोळा येथे आणण्यात आले.तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वर येथे पाठविण्यात आले .

उपचार सुरू असताना एकीचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघींना वाचविण्यात यश आले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात शोककळ पसरली आहे.  दोन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान राज्यात पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनेत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसापुर्वीच मुंबईच्या माहीम चौपाटीवर देखील पोहायला गेलेले पाच मुले बुडाल्याची घटना घडली होती. यावेळी 4 जणांना वाचवण्यात यश आले होते तर 1 जणाचा बुडून मृत्यू झाला होता. सततच्या असल्या घटनासाठी प्रशासन देखील खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे.