Bribery | (Photo credit: archived, edited, representative image)

गुन्हा कोणताही असो, सामान्य नागरिकाचे न्याय मिळण्याचे एकमेव ठिकाणी म्हणजे न्यायालय. पण, या न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचाराची वाळवी घुसली आहे. एका प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी चक्क न्यायधीशांनीच तब्बल पाच लाख रुपयांची लाच () घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायाधीश (District Sessions Judge) धनंजय निकम (Dhananjay Nikam) यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti-Corruption Bureau) केलेल्या कारवाईवरुन हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्याबाबतचे हे प्रकरण आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्राप्त माहितीनुसाह, गुन्ह्याचा प्रकार 3,9 आणि 10 डिसेंबर रोजी घडला आहे. पुणे येथील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे:

जामीन देण्यासाठी पैशांची मागणी?

या प्रकरणात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार तरणीच्या वडिलांवर एका प्रकरणात खटला सुरु आहे. त्याबाबतचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात प्रलंबीत आहे. वडिलांना जामीन मिळावा यासाठी तरुणी आणि तिच्या वकीलांचा प्रयत्न आहे. दरम्यान, जामीन मिळविण्यासाठी कथीतरित्या पाच लाख रुपयांची मागणी तक्रारदारांकडे करण्यात आली. हा सर्व प्रकार जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यासोबत संशयित क्रमांक एक आणि दोन यांनी संगनमत करुन केला. त्याबाबत संशयित आणि तक्रारदार यांच्यात कथीतरित्या चर्चाही झाली.

दरम्यान, चर्चेत ठरल्यानुसार तक्रारदाराकडून तब्बल पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी शयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी इसमाने दर्शवली होती. ही देवाणघेवाण 10 डिसेंबर रोजी होणार होती. दरम्यान, संशयितांनी ही रक्कम वाहनात आणून द्या, असे सांगितले. तसेच, लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दाखल तक्रारीवरुन सातारा शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरुच आहे.