Crime | (File image)

सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) दत्तनगर-कोडोली येथे एक अमानूष प्रकार पाहायला मिळाला. घरगुती भांडणातून एकाने चक्क 10 महिन्याच्या बाळाला विहिरीत फेकले. धक्कादायक असे की, हा व्यक्ती कोणी परका मनुष्य नाही. तर, तो पीडित बाळाच्या वडीलांचा सख्खा भाऊ म्हणजेच या बाळाचा चुलता आहे. घरगुती भांडणातून या मातेफिरु व्यक्तीने हे कृत्य केले. या प्रकारानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक केली आहे. चॉकलेट देतो असे सांगून अक्षयने बाळाला घराबाहेर नेले होते.

धक्कादायक असे की, संशयीत आरोपी अक्षय मारुती सोनवणे हा पीडित बालकाचा लहान चुलता आहे. घरगुती भांडणातून तो चिडला होता. दुकानात घेऊन जातो असे सांगत तो बाळाला घरातून घेऊन गेला. दुकानात जाता जाता त्याने बाळाला विहिरीत टाकले. धक्कादायक म्हणजे सातारा-रहिमतपूर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीतबाळाला फेकल्यावर या क्रूर व्यक्तीस काहीच वाटले नाही. त्याने आपल्या कृत्याची माहिती आपल्या मोठ्या भावालाही दिली. विहीरीत जाऊन पाहणी करेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा, Pune: अखेर पुण्यातील 'त्या' हत्येचा उलगडा, 9 आरोपी ताब्यात)

घरगुती वादात लहानग्या बाळाचा जीव गेल्याने दत्तनगर- कोडोली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक केली आहे. चॉकलेट देतो असे सांगून अक्षयने बाळाला घराबाहेर नेले होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीने चिमूकल्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. सातारा पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत.