जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण मुंबई महापालिकेत (BMC) लिपिक पदांसाठी 810 रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी तब्बल एक लाखापेक्षा अधिक अर्जाची नोंदणी करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या नोकर भरतीत कार्यकारी सहाय्यक वर्गासाठी एकूण 5255 पदे असून त्यापैकी सरळसेवा मार्गाने 3221 पदे भरण्यात येणार आहेत. यामधून सुद्धा 810 पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. महाऑनलाईनच्या महा रिक्रुटमेंट संकेतस्थळावरुन ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत ते झळकवण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर लवकरच अर्ज करण्यासाठी लिंक दिली जाणार असून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.(Maharashtra Police Bharti 2020: पोलीस दलात मेगाभरतीची संधी, लवकरच 8 हजार रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार)
उमेदवारांची निवड महाऑनलाईन लिमिटेड कंपनीकडून केली जाणार आहे. त्यानुसार उमेदवारांची चाचणी परिक्षा सुद्धा घेतली जाणार आहे. परिक्षेत ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज, संगणक ज्ञान परिक्षा, इंग्रजी आणि मराठी टंकलेखन कौशल्या या गोष्टींवर आधारित परिक्षाअंतर्गत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 900 रुपये, मागासवर्गीय आणि अन्य मागास वर्गासाठी 700 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.