Tara Singh | Photo Credits: twitter

मुंबईच्या मुलूंड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि भाजपा नेते सरदार तारा सिंह (Sardar Tara Singh)  यांच्या निधनाच्या अफवा काल दिवसभर सोशल मीडीयामध्ये फिरत होत्या. दरम्यान त्यानंतर मुंबईमधील अनेक भाजपा नेत्यांनी तारा सिंह यांच्या प्रकृतीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. विनोद तावडे यांनी लीलावती रूग्णालयामध्ये (Lilavati Hospital) जाऊन तारा सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तर त्यापाठोपाठ रात्री आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी देखील लीलावतीमध्ये हजेरी लावली होती.

मुलूंडचे भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी ट्वीटरच्या माध्यामातून सरदार तारा सिंग यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा सिंह यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. कालपेक्षा त्यामध्ये सुधार होता. दरम्यान यावेळी मिहिर कोटेचा यांनी लीलावती रूग्णालयामध्ये तारा सिंह यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली आहे. Sardar Tara Singh Death Rumor: सरदार तारा सिंह यांच्या मृत्यूच्या बातम्या अफवा; अत्यावस्थ अवस्थेमधून लवकर बाहेर पडावेत यासाठी प्रार्थना करा: भाजपा नेते विनोद तावडे

आमदार मिहीर कोटेचा ट्वीट  

दरम्यान विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिटिकल अवस्थेमध्ये असलेले सरदार तारा सिंह हे लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत. मात्र सोशल मीडीयात पसरवले जाणारे त्यांच्या निधनाचे वृत्त खोटं आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. तारा सिंह आजारपणातून लवकर बाहेर पडावेत यासाठी प्रार्थना करा.

काल दुपारी भाजपाच्या नेत्यांनीच तारा सिंह यांच्या निधनाचं वृत्त देत त्यांना श्रद्धांंजली अर्पण केली होती. मात्र त्यांच्या मृत्यूच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं समजताच त्यांनि ट्वीट्स डिलीट देखील केली. मात्र दिवसभर खोट्या बातम्यांना पेव आला होता.