शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) येथे पत्रकार परिषद ( Sanjay Raut's Press Conference) घेणार आहेत. उद्या (मंगळवार, 8 मार्च) दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. या वेळी संजय राऊत आपल्या 'मार्मिक' शब्दांमध्ये कोणावर 'प्रहार' करणार याबाबत उत्सुकता आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, भाजप विरुद्ध महाविकासआघाडी सरकार आणि शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असा 'सामना'क पाठिमागील काही दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान, या सर्व संघर्षावर संजय राऊत यांनी 'शिवसेना भवन' येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक स्फोट केले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केल्याने उत्सुकता टीपेला पोहोचली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत म्हटले आहे की, उद्या दुपारी चार वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आहे. संजय राऊत हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. शिवसेनेवर होणाऱ्या प्रत्येक आरोपावर संजय राऊत मोठ्या ताकदीने प्रत्युत्तर देतात. मग तो मुद्दा राष्ट्रीय स्तरावरील असो की स्थानिक पातळीवरील. संजय राऊत यांची तोफ शिवसेनेसाठी जोरदार धडाडते. (हेही वाचा, Goa Assembly Election 2022: गोव्यातही महाराष्ट्र पॅटर्न वापरलं जातय; भाजपकडून विरोधकांचे फोन टॅपिंग होत असल्याचा संजय राऊत यांचा दावा)
संजय राऊत यांनी या आधीची पत्रकार परिषद ईडी कार्यालयाबाहेर घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यात बदल करुन ती शिवसेना भवन येथे घेण्यात आली. शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, ईडीला नेहमी महाविकासाघाडी आणि भाजप सरकार नसलेल्या राज्यांमधीलच भ्रष्टाचार दिसतो. आपण अनेक वेळा ईडीकडे तक्रार करुनही इडी त्याकडे लक्ष देत नाही. भाजप नेत्यांनी केलेल्या तक्रारीकडे मात्र इडी तातडीने लक्ष देते असे म्हटले होते.
Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
दरम्यान, आगामी काळात भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. शिवाय 'बाप बेटे तुरुंगात जाणार' असेही ते ट्विटरच्या माध्यमातून वारंवार सांगत असतात. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत कोणावर टीकेचे बाण सोडणार आणि कोणकोणते गौप्यस्फोट करणार याबाबत उत्सुकता आहे.