मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'काय म्हणतंय ठाकरे सरकार' मुलाखतीचा टीजर संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून केला प्रदर्शित, Watch Video
CM Uddhav Thackeray and Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

बहुचर्चित आमि बहुप्रतिक्षित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यानी घेतलेली दिलखुलास मुलाखत 'काय म्हणतंय ठाकरे सरकार' येत्या 25 आणि 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या unlocked मुलाखतीचा टीजर संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. तसेच येत्या 27 जुलै ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 60 वा वाढदिवस आहे. यामुळे या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणखी काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या टीजरमध्ये केला आहे. त्याचसोबत 60 व्या वर्षी मुख्यमंत्री याबाबतही मजेशीर उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. काय म्हणतंय ठाकरे सरकार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत कुठे आणि कधी पाहता येईल, वाचा सविस्तर

पाहा ट्विट:

येत्या 25 आणि 26 जुलै ला सामनाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येईल. त्यामुळे या मुलाखतीचा तुम्हाला एक भाग बनायचा असेल तर येथे क्लिक करा.

लॉकडाऊन (Lockdown), राम मंदिर (Ram Mandir), कोरोना व्हायरस (Coronavirus), राजकारणातील घडामोडी यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व जनता उत्सुक आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला या कार्यक्रमातून मिळणार आहेत.