Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

Sanjay Raut On Dhanajay Munde:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप लावल्यानंतर राजकरण तापले आहे. विरोधकांकडून आता धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी असे म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप वैयक्तिक आणि कौटुंबिक आहेत. त्यामुळे राजकरण यामध्ये आणण्याची गरज नाही आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष यावर योग्य ती भुमिका घेत निर्णय घेईल असे ही राऊत यांनी म्हटले आहे.(Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणी जंयत पाटील, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या प्रतिक्रिया)

मुंडे यांच्यावर भाजप यांच्याकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला ही त्यांनी घेरले असून मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन करु असा इशारा दिला आहे. अशातच शिवसेनेची भुमिका संजय राऊत यांनी स्षष्ट केली आहे. पुढे राऊत यांनी असे ही म्हटले की, राजकीय विषयावर आरोप-प्रत्यारोप करावेत. पण खासगी आयुष्याबद्दल राजकरण करु नये.(Sharad Pawar On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरूप गंभीर, पक्षातील इतर नेत्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार: शरद पवार)

दरम्यान,धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहीत सविस्तर खुलासा केला. या आरोप प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी एका बैठकीदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची तसेच, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे वृत्त आहे.