Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

शिवसेना (UBT) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जतना पक्षावर टीका करताना थेट तुलना हमास संघटनेसोबत केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी इस्रायल-हमास संघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, की आसामचा मुख्यमंत्री हा पक्ष 'हमास'पेक्षा कमी नाही. आपला मुद्दा कायम ठेवत ते म्हणाले की, ते (आसामचे मुख्यमंत्री) ज्या पक्षाचे आहेत ते हमासपेक्षा कमी नाहीत, ते केंद्रीय एजन्सींचा गैरवापर करत आहे आणि विरोधी पक्षांना उद्ध्वस्त करत आहे. त्यांनी आधी इतिहास वाचला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पक्ष जाणून घेतले पाहिजेत. त्यानंतर पॅलेस्टाईन-इस्रायलवर बोलले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

एक्स पोस्ट

दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शरद पवार आणि त्यांची कन्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. त्यांनी म्हटले होते की, "मला वाटते शरद पवार सुप्रिया (सुळे) यांना हमाससाठी लढण्यासाठी गाझाला पाठवतील". सरमा यांना प्रत्युत्तर देताना लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितले की, अशी टिप्पणी करण्यापूर्वी भाजपने शरद पावर यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकण्याची आवश्यकता होती. त्यांचे वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण हिमंता बिस्वा सरमाचा माझ्यासारखाच डीएनए आहे, ते मूळचा काँग्रेसचे आहेत. ते आणि मी काँग्रेसचा एकच डीएनए शेअर करतो... भाजप महिलांचा कसा अनादर करते हे तुम्हाला माहिती आहे. पण हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून मला आशा होत्या. मला आश्चर्य वाटते की हा महिलांच्या बाबतीत आणि दृष्टिकोनात बदल कसा झाला. बहुदा ते भाजपमध्ये गेल्यान हा बदल झाला असेल.

एक्स पोस्ट

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना (15 ऑक्टोबर रोजी) संबोधित करताना म्हटले होते की, भारताच्या माजी पंतप्रधानांची भूमिका “पॅलेस्टाईनला मदत करणे” होती. "जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती. पहिल्यांदाच या देशाच्या पंतप्रधानांनी इस्रायलच्या भूमिकेला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. जे लोक मूळचे त्या भूमीचे आहेत, असे पवार यांनी मुंबईत बोलताना सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सडलेली मानसिकता असल्याचा आरोप करत भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.